पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात सरकारकडून 3 रुपयांनी वाढ

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 3 रुपये प्रती लिटरने वाढ केली आहे. त्यामुळे सरकारला 39 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

सरकारने पेट्रोलवरील विशेष उत्पादन शुल्क 2 रुपयांनी वाढून 8 रुपये प्रती लिटर आणि डिझेलवरील शुल्क 2 रुपयांवरून 4 रुपये प्रती लिटर केले आहे. याशिवाय पेट्रोल आण डिझेलवरील रोड सेस (उपकर) 1 रुपये प्रती लिटरने वाढवल्याने रोड सेस 10 रुपये झाला आहे.

यामुळे पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क 22.98 रुपये प्रती लिटर आणि डिझेलवरील शुल्क 18.83 रुपये प्रती लिटर झाले आहे.

तेल कंपन्यांनी उत्पादन शुल्कात वाढ झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत क्रमशः 13 आणि 16 पैशांनी कमी केल्या आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमती घसरल्या आहेत, त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा एवढा परिणाम पेट्रोल-डिझेलवर दिसून येणार नाही.

Leave a Comment