घरच्याघरी त्वचा अशी ‘ डी-टॉक्स ‘ करा


आजकाल बाहेर पडताना आपल्याला ऊन, धूळ, प्रदूषण यांचा सतत सामना करावा लागतो. तसेच आहारामधील सततच्या परिवर्तनामुळे, अनियमित व्यायाम आणि झोपेच्या सवयींमुळे शरीरामध्ये घातक द्रव्ये साठत असतात. धूळ, प्रदूषण यांच्यामुळे त्वचेवर देखील घातक द्रव्ये साठत असतात. शरीराच्या आतील द्रव्ये पाणी, फळे, भाज्या इत्यादींचा समावेश वाढवून काढून टाकता येतात. त्याचप्रमाणे त्वचेवरील घातक द्रव्ये काढून टाकण्यासाठी, म्हणजेच त्वचा डीटॉक्सिफाय ( डी-टॉक्स ) करण्यासाठी घरच्याघरी काही उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.

ड्राय बॉडी ब्रशिंग हा डी टॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी चांगल्या प्रतीचा, शक्यतो ऑरगॅनिक पद्धतीने बनविलेला बॉडी ब्रश घ्यावा आणि पायांपासून त्वचा ब्रश करण्यास सुरुवात करावी, ब्रश करताना पायाकडून हृदयाच्या दिशेने लांब स्ट्रोक्सनी ब्रश करावे. सर्व त्वचा ब्रश करून झाल्यानंतर कोमट पाण्याने स्नान करावे. बॉडी ब्रशिंगमुळे संपूर्ण त्वचेवरील मृत पेशी नाहीश्या होतील, शरीरातील आणि त्वचेवरील टॉक्झिन्स बाहेर पडतील, त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारेल, व मन ही प्रफुल्लीत राहील.

पिंक सॉल्ट रब ह्या प्रकाराने डीटॉक्स करण्यासाठी आवश्यक असलेले पिंक सॉल्ट हिमालय क्षेत्रातच मिळते. पण हे सॉल्ट ऑनलाईन उपलब्ध आहे. गुलाबी रंगाची छटा असणारे हे मीठ सर्वात शुध्द समजले जाते. एक कप पिंक सॉल्ट व अर्धा कप खोबरेल तेल एकत्र करावे. या मध्ये मूठभर वाळविलेल्या गुलाब पाकळ्या घालाव्या, आणि सुवासासाठी दहा बारा थेंब जिरेनियम किंवा लॅव्हेंडर ऑईल घालावे. स्नानापूर्वी ह्या मिश्रणाने अंग चोळावे, आणि मग त्यानंतर वीस मिनिटांनी स्नान करावे. ह्या मिश्रणाच्या उपयोगाने त्वचेवरील मृत पेशी आणि घातक दद्रव्ये हटण्यास मदत होते, आणि त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment