कोरोनाबाबत जागृक करण्यासाठी थेट रोबॉटची केली नेमणूक

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जागृक करण्यासाठी मनुष्याबरोबर आता रोबॉट देखील जोडले गेले आहेत. केरळ स्टार्टअप मिशनने (केएसयूएम) दोन रोबॉटची यासाठी नेमणूक केली आहे. हे रोबॉट सॅनिटायझर्स आणि मास्क वाटण्यासोबतच यापासून वाचण्यासाठी जागृक देखील करत आहेत. हा प्रोग्राम असिमोव्ह रोबॉटिक्सद्वारे तयार करण्यात आला आहे.

दोन्ही रोबॉटला वेगवेगळे काम देण्यात आलेले आहे. एक रोबॉट मास्क, सॅनिटायजर आणि नॅपकिन वाटत आहे. तर दुसरा रोबॉट स्क्रिनवर जागतिक आरोग्य संघटनेने व्हायरसपासून वाचण्यासाठी दिलेली माहिती शेअर करत आहे.

असिमोव्ह रोबॉटिक्सचे सीईओ आणि संस्थापक जयकृष्णन टी यांच्यानुसार, कोरोना व्हायरसपासून बचावाच्या या अभियानात रोबॉटच्या वापराने लोकांचे लक्ष याकडे खेचले आहे. हे रोबॉट विमानतळ आणि सार्वजनिक ठिकाणांवर लावण्याचा देखील केएसयूएमचा विचार आहे.

Leave a Comment