भारतात प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाईल

भारतात मोबाईलधारकांची संख्या वेगाने वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की सध्या मोबाईल फोनची संख्या देशातील प्रौढ व्यक्तींच्या लोकसंख्येपेक्षा अधिक झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, मोबाईलधारकांची संख्या 115 कोटी 14 लाख 37 हजार 99 एवढी झाली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील प्रौढ लोकसंख्या जवळपास 108.85 कोटी आहे.

आकड्यांनुसार मोबाईलधारकांच्या संख्येत उत्तरप्रदेश अव्वल स्थानी असून, येथे एकूण 16.85 कोटी मोबाईलधारक आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून, येथे 9.26 कोटी मोबाईलधारक आहेत. यानंतर आंध्रप्रदेशमध्ये 8.70 कोटी, बिहारमध्ये 8.43 कोटी आणि तामिळनाडूमध्ये 8.18 कोटींपेक्षा अधिक मोबाईलधारक आहेत.

मध्य प्रदेशमध्ये ही संख्या 7.48 कोटी, गुजरात – 6.74 कोटी, कर्नाटक – 6.73 कोटी, राजस्थान – 6.53 कोटी, पश्चिम बंगाल – 5.52 कोटी, पंजाब – 3.91 कोटी, ओडिसा – 3.30 कोटी, हरियाणा – 2.77 कोटी, उत्तर पूर्व – 1.21 कोटी, हिमाचल प्रदेश – 1.05 कोटी आणि जम्मू-कश्मिरमध्ये 1.03 कोटींपेक्षा अधिक मोबाईलधारक आहेत.

शहरांनुसार, सांगायचे तर या यादीमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. येथे एकूण 5.29 कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत. मुंबईमध्ये 3.80 कोटी, कोलकत्तामध्ये 2.56 कोटी मोबाईलधारक आहे.

ट्रायने म्हटले आहे की, इंटरनेटचा प्रसार आणि स्वस्त डाटामुळे मोबाईलधारकांच्या संख्येत वाढ होत आहे. काही जणांकडे एकापेक्षा अधिक फोन आहेत. येणाऱ्या काळात मोबाईलधारकांची संख्या अधिक वाढेल.

Leave a Comment