स्वदेशी ‘नाक लंगोट’ किट करणार कोरोना व्हायरसपासून बचाव !

कोरोना व्हायरसच्या भितीने बाजारात मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे आता इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, मोहालीच्या वैज्ञानिकांनी खास भारतीय पद्धतीने कोरोना व्हायरस किट तयार केले आहे. या किटमध्ये मास्कसह अन्य गरजेच्या सर्व गोष्टी आहेत, ज्याद्वारे कोरोना व्हायरसपासून बचाव होईल.

वैज्ञानिकांनी या किटला ‘नाक लंगोट’ असे नाव दिले आहे. हे किट लोकांना मोफत देण्यात येत आहे. संस्थेमध्ये जाऊन कोणीही हे किट घेऊ शकते.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्चचे वैज्ञानिक डॉ. सम्राट घोष यांनी सांगितले की, जे लोक महागडे मास्क खरेदी करू शकत नाही,  अशांनी व्हायरसपासून स्वतःचा बचाव कसा करायचा ? याच विचाराने सुती कापडच्या रुमालाने स्पेशल मास्क बनवण्यात आला. या मास्कचे दोन भाग आहेत. एक भाग नाकाला लावला जातो व दुसरा चेहऱ्याला झाकतो.

घोष यांनी सांगितले की, किट दोन मास्क बनवू तयार करण्यात आले आहे. यात एक स्टार्चद्वारे बनलेला लिफाफा देखील आहे. ज्यात केमिकलचा वापर करण्यात आलेला आहे. खोकला आल्यास व्यक्ती त्यात खोकू शकतो. त्यानंतर त्या लिफाफ्याला कचऱ्यात फेकून द्यावे. तसेच चेहऱ्यावर लावले जाणारे मास्क धुवता देखील येते. या मास्क बनविण्याची पद्धत देखील त्यांनी युट्यूबवर सांगितली आहे.

Leave a Comment