येथे सापडले जगातील सर्वात लहान डायनॉसोरचे अवशेष

म्यानमारमध्ये जगातील सर्वात लहान डायनॉसोरचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष अंबरमध्ये (पारदर्शी पदार्थ) सुरक्षित आढळले आहेत. या डायनॉसोरचा मृत्यू झाडाच्या छिद्रात डोके अडकल्याने झाला होता. यानंतर झाडाच्या गोंदने हे डोके झाकले होते. हे अवशेष जवळपास 990 लाख वर्ष जुने असल्याचे सांगितले जात आहे. संशोधकांनी याचे नाव ओकुल्यूडेन्टॅविस खाँग्राए असे ठेवले आहे.

हा जीव सध्याच्या 2 ग्रॅमपेक्षाही कमी वजनाच्या क्यूबा हमिंगबर्ड पेक्षाही लहान होता. हा जीव किड्यांची शिकार करत असे.

Image Credited – Bhaskar

संशोधकांनुसार, हे अवशेष पाहून असे वाटते की याचा मृत्यू कालच झाला आहे. एक चतृतांश अवशेषाचा आकार ब्लूबेरी पेक्षाही लहान आहे. या आधारावर संशोधकांनी डायनॉसोरचा कॉम्प्युटरवर पुर्ण रचना तयार केली आहे. अवशेषाच्या जबड्यात 100 दात आहेत. हे दात ब्लेडसारखे आहेत. यांना 3डी तंत्रज्ञानाद्वारे पाहता येते.

संशोधन पेपरच्या लेखिका जिंग्मा ओकोन्नार यांनी सांगितले की, अंबरमध्ये ओकुल्युडेन्टावीसचे डोळे देखील दिसतात. जे एखाद्या रांगणाऱ्या जीवापेक्षाही छोटे आहे. डोळे उघडे आहेत. या जबड्यात दात असून, आजच्या पक्ष्यांमध्ये दात नाहीत.

Leave a Comment