आधी उडवली कोरोनाची खिल्ली, त्यालाच दुसऱ्या दिवशी झाला संसर्ग

राष्ट्रीय बास्केटबॉल संघाला (एनबीए) यूटा जॅजचा खेळाडू रुडी गोबर्टला सुरूवातीच्या तपासणीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यानंतर एनबीएने यंदाचे सीझन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपुर्वीच रुडी गोबर्टने एका पत्रकार परिषदेदरम्यान कोरोना व्हायरसची खिल्ली उडवली होती. गोबर्टने परिषदेतून निघण्याआधी सर्व मायक्रोफोनला मस्करीमध्ये स्पर्श केले आणि व्हायरसची खिल्ली उडवली होती.

गोबर्टला या व्हायरसचा संसर्ग कसा झाला, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र रिपोर्टनुसार, तो फ्रान्सच्या एखाद्या संक्रमित प्रवाशाच्या संपर्कात आला असण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरातील अनेक मोठे इव्हेंट रद्द करण्यात आले असून, आता क्रिडा स्पर्धांवर देखील याचे सावट दिसून येत आहे. यामुळे अमेरिकेतील प्रतिष्ठित आणि चर्चित बास्केटबॉल लीग यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Leave a Comment