बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी सेंगरसह ७ जणांना दहा वर्षांचा तुरुंगवास


नवी दिल्ली – दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी निकाल दिला असून १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरसह ७ जणांना ठोठावण्यात आली आहे. कुलदीप सेंगरचा भाऊ अतुल सेंगर याचाही यामध्ये समावेश आहे. तसेच पीडितेला कुलदीप आणि अतुल सेंगर या दोघांनी प्रत्येकी १० लाख देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ९ एप्रिल २०१८ साली तुरुंगात असताना पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने या प्रकरणी सेंगरसह ७ जण दोषी असल्याचा निर्णय दिला होता. यावर आज निर्णय देण्यात आला.

सेंगरवर ४ जून २०१७ ला पीडितेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर पीडितेच्या वडिलांना कुलदीप सेंगरचा भाऊ अतुल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाण केली होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. कुलदीप सेंगरला बलात्कार प्रकरणात याआधीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तसेच १० लाख रुपये पीडितेला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

Leave a Comment