कोरोना संबधीत माहितीसाठी केंद्र सरकारने जारी केले हेल्पलाईन नंबर


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता केंद्र सरकराने सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. नागरिकांना या नंबरच्या माध्यमातून कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. केंद्र सरकारने ०११ – २३९७८०४६ हा क्रमांक जारी केला आहे. तर ०२० – २६१२७३९४ या नंबरवर महाराष्ट्रातील नागरिक संपर्क साधू शकतात. त्याचयाबरोबर १५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठीही मदत क्रमांक जारी केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

१०४ क्रमांकाचा वापर बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्कीम, तेलंगाना, उत्तराखंड, दादर आणि नगर हवेली, दीव-दमन , लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी येथील नागरिकांनी कोरोना संबधी मदतीसाठी करावा, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. मेघालय १०८ आणि मिझोरम १०२ हा क्रमांक मदतीसाठी वापरत आहेत. तर केंद्र सरकारचा हेल्पलाईन नंबर ०११-२३९७८०४६ हा आहे.

नागरिक या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन कोरोना संबधी माहिती घेऊ शकतात. कोरोना व्हायरससंबंधी अनेक जण अफवाही पसरवत असल्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी नागरिक या क्रमांकावर फोन करावा. खबरदारी घेण्यासाठी काय करावे, तसेच काही शंका असल्याच या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा.

Leave a Comment