1 एप्रिलपासून या लोकप्रिय कार्सची विक्री होणार बंद

1 एप्रिल 2020 पासून अनेक कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर दिसणार नाहीत. या दिवसापासून देशभरात नवीन बीएस-6 मानक इंजिनचे नियम लागू होणार आहेत. कंपनीने काही कार या इंजिनमध्ये अपग्रेड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वच कंपन्यांना आपल्या काही कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Credited – Amarujala

महिंद्रा केयूव्ही100 डिझेल व्हेरिएंट –

महिंद्राने आपल्या केयूव्ही100 डिझेल व्हेरिएंट आणि बोलेरो प्लस कार बंद करणार आहे. या व्यतिरिक्त टोयोटा इटियोस रेंजच्या लिव्हा, सेडान आणि क्रॉससह कोरोला एलिटस बंद करणार आहे. तसेच टाटा टोर्सने देखील हेक्सा, सफारी स्ट्रोम, जेस्ट, बोल्ट बंद करणार असल्याचे सांगितले आहे.

Image Credited – Amarujala

मारुती सुझुकीने देखील आधीच डिझेल व्हेरिएंट बंद करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मारुतीने व्हिटारा ब्रेझा आणि एस-क्रॉसला बीएस-6 पेट्रोल इंजिनसह लाँच केले आहे. रेनोने देखील आपल्या कारचे डिझेल इंजिन व्हेरिएंट बंद केले आहे. ह्युंडाई आपल्या अनेक बीएस4 कार्सला बीएस6 मध्ये अपग्रेड करत आहे. कंपनीने कॅब ड्रायव्हर्स आणि प्लीट सेगमेंटच्या एक्सेंट प्राइम डिझेलला बंद केले आहे.

Image Credited – Amarujala

महिंद्राने बोलेरो प्लस 9 सीटर, प्लस एम्बुलेंस आणि केयूव्ही100 डिझेल व्हेरिएंटला बंद केले असले तरी कंपनी याचे प्रेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट सुरू ठेवेल.

मारुती सुझुकीने देखील आपल्या कार्सला बीएस6 व्हेरिएंटमध्ये अपग्रेड करण्यास आधीच  सुरूवात केली आहे. कंपनी एक वर्षाच्या आत सर्व कार्सला बीएस6 मध्ये अपग्रेड करेल. कंपनीने ऑल्टो, बलेनो, व्हॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, अर्टिगा, एक्सएल6, एसप्रेसोसह अनेक मॉडेल्सला बीएस6 इंजिनमध्ये अपग्रेड केले आहे. तर टाटा मोटर्स आता नेक्सॉन, अल्ट्रोज, टियागो, हॅरियर आणि नेक्सॉन इलेक्ट्रिकवर लक्ष्य केंद्रित करणार आहे.

Leave a Comment