कोरोना संक्रमित फुफ्फुसाचा पहिला 3डी फोटो आला समोर

जागतिक महामारी म्हणून घोषित केलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 3300 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या व्हायरसवर लस शोधण्याचे काम जगभरातील वैज्ञानिक करत आहेत. रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकेने कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या फुफ्फुसाचा 3डी फोटो जारी केला आहे.

फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की हे फुफ्फुस चिकट आणि गडद म्यूकसने (चिकट पदार्थ) भरलेले आहेत. या कारण रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. कोरोना व्हायरसचा सर्वात पहिला परिणाम व्यक्तीच्या श्वसन तंत्रावरच होतो. फुफ्फुस संक्रमित होणे हा पहिला टप्पा असतो.

या 3डी इमेजमुळे डॉक्टर एक्सरे आणि सीटी स्कॅनद्वारे गंभीर पद्धतीने संक्रमित असलेल्या रुग्णांची ओळख करू शकतील. यानंतर त्या रुग्णांना त्वरित वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल.

दरम्यान, भारतात सरकारने केंद्रीय स्तरावार 011-23978046 फोन नंबरवर हेल्पलाईन सुरू केली असून, 15 पेक्षा अधिक राज्यांनी देखील यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.

Leave a Comment