चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याचा मोठा फकटा अर्थव्यवस्थेला देखील बसला आहे. फूड डिलिव्हरी कंपन्यांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत असून, लोक जेवण ऑर्डर करायला घाबरत आहेत. मॅकडॉनल्ड आणि स्टारबक्स सारख्या कंपन्या नो-कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीची सुविधा देत आहेत.
कोरोना : फूड डिलिव्हरी कंपन्यांनी जारी केले ‘नो-कॉन्टॅक्ट’ फीचर
भारतील अनेक फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांना कोरोना व्हायरसबाबत जागृक करत आहेत. फूड डिलिव्हरी कंपन्या पार्टरन रेस्टोरेंटच्या किचनच्या स्वच्छतेवर देखील बारीक लक्ष ठेऊन आहे. अॅप देखील हायजिन रेटिंगच्या हिशोबाने रेस्टोरेंट लिस्ट करत आहे, जेणेकरून ग्राहकांना चांगल्या रेस्टोरेंटमधून जेवण ऑर्डर करू शकतील.
कंपन्यांनी आपल्या अॅपमध्ये कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीसाठी देखील काही निर्देश जारी केले आहेत. ज्या अंतर्गत तुमच्या सांगण्यावरून फुड डिलिव्हरी बॉय ऑर्डरला तुमच्या हातात देण्याऐवजी दरवाज्यासमोर ठेवेल. ही सुविधा केवळ ऑनलाईन पेमेंट मोड ऑर्डर्सवरच सुरू आहे.