अक्षय कुमारच्या सूर्यवंशीला देखील कोरोनाचा फटका


जगभरात घोंगावत असलेले कोरोना व्हायरसचे सावट पाहता सध्या सर्वच स्तरातील लोक खबरदारीचे उपाय करत आहेत. अनेक देशभरातील लोक गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तोंडाला मास्क लावणे यांसारख्या गोष्टी करताना दिसत आहे. त्याचबरोबर गर्दी होतील असे कार्यक्रम, क्रिकेट सामने देखील रद्द करण्यात आले आहेत.


दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याच पार्श्वभूमीवर आपला आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलले आहे. त्याने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. येत्या 24 मार्चला अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेली सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होणार होता. पण हा चित्रपट आता कधी रिलीज होणार याबाबत कुठलीही माहिती रोहितने दिलेली नाही.

याबाबतची सविस्तर माहिती सूर्यवंशी चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने ट्विटरच्या माध्यमातून देत या चित्रपटावर आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांनीही आमच्या या मेहनतीला भरभरुन दाद दिली. पण सध्या देशभरात कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट आम्ही तारीख पुढे ढकलल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment