महापुरुषांच्या प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ वादात


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप शाहूप्रेमींनी केला आहे.

लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू…

Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Friday, March 13, 2020

राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा बुधवारी म्हणजेच ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमात चूकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘विजेता’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दिवशाच्या खास कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आल्यामुळे शाहुप्रेमींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हा भाग प्रसारित झाल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ टीमवर टीका केली आहे. नेटकऱ्यांनी त्या भागावर आक्षेप घेत हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील या प्रकरणी निलेश साबळेवर निशाणा साधत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment