अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली नमस्कार करण्याची वेळ


वॉशिंग्टन – चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जगभरातील सर्वचजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतेच हस्तांदोलन करण्याएवजी भारतीय पद्धतीने नमस्कार करणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पसंद केले.

नुकतेच आयर्लंडच्या पंतप्रधानांची डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेतली. आम्ही दोघांनीही हस्तांदोलन न केल्यामुळे आम्हाला थोडे अवघडल्यासारखे वाटले. मग आम्ही भारतीय पद्धतीने एकमेकांना नमस्कार केला. नुकताच मी भारताला भेट देऊन आलो आहे. तेथेही मी कोणाबरोबर हस्तांदोलन केले नाही. नमस्कार घालणे खूप सोप्पे असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

कोरोना हा साथीचा आजार असून तो एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. नाक, तोंडाला हात लावणेही टाळावे. कारण अस्वच्छ हाताद्वारे कोरोनाचा विषाणू शरिरात प्रवेश करु शकतो. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आहावन प्रत्येक देशाकडून करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागांनी नियमावली जारी केली आहे.

Leave a Comment