दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालये आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद


नवी दिल्ली – कोरोनाला ‘जागतिक महामारी’असे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्यानंतर दिल्लीमधील केजरीवाल सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले आहे. ३१ मार्चपर्यंत चित्रपटगृहे आणि सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, राज्याचे मुख्य सचिव विजय देव या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत कोरोना आजाराला महामारी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी फक्त ५ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वच शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी २५ रुग्णालय सज्ज ठेवली आहेत.

Leave a Comment