कुणाची असेल बरे ही न मिटलेली सावली


प्रकाश असताना कोणत्याही वस्तूची मग ती सजीव असो वा निर्जीव, सावली पडते हे आपल्याला माहिती आहे. पण प्रकाशापासून ती वस्तू गेली की सावली नष्ट होते हा आपला सर्वांचा अनुभव आहे. जपानच्या हिरोशिमा शहराचा इतिहासात अधिकाधिक उल्लेख होतो तो या शहरावर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने टाकलेल्या पहिल्या अणुबॉम्बच्या विषयात. ६ ऑगस्ट १९४५ ला हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब पडला आणि काही मिनिटात शहर होत्याचे नव्हते झाले. लाखो माणसे ठार झाली तर बॉम्बमुळे झालेल्या किरणोत्सर्गामुळे नंतर कित्येक वर्षे अनेक माणसे विविध आजार होऊन मृत्युमुखी पडली.

याच दिवशी हिरोशिमामध्ये पायऱ्यांवर एक सावली निर्माण झाली आणि आज ७५ वर्षानंतरही तिचे गुढ किंवा रहस्य कायम आहे. ‘द हिरोशिमा स्टेप्स शॅडो’ या नावाने ती ओळखली जाते. हिरोशिमावर ज्या जागी अणुबॉम्ब पडला त्यापासून ८५० मीटर दूर ही अजब सावली आहे. येथे तेव्हा कोण बसले होते, तो कोण होता, कुठला होता याची काहीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. एक मात्र नक्की की या बॉम्ब हल्ल्यात माणूस गेला पण सावली सोडून गेला.

या सावली मागची खरी हकीकत कुणालाच माहिती नाही. विशेष म्हणजे हिरोशिमा नंतर नागसावीवर अणुबॉम्ब पडला तेथेही असाच हाहाकार माजला. या हल्ल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये सायकल, स्टिअरिंग अश्या वस्तूंच्या अश्याच गुढ सावल्या निर्माण झाल्या पण माणसाची ही एकमेव सावली आहे.

Leave a Comment