असा आहे जोतीरादित्यांचा जयविलास महाल


फोटो सौजन्य कॅच न्यूज
ग्वाल्हेरच्या राजघराण्याची ओळख राजघराण्यातील प्रसिद्ध व्यक्तीमुळे जशी आहे तशीच ती त्यांच्या प्रसिद्ध जयविलास महालामुळेही आहे. नुकतेच भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वास्तव्य याच महालात असते. या महालाच्या निम्म्या भागात आता संग्रहालयात असले तरी निम्मा भाग सिंधिया राहण्यासाठी वापरतात. देश विदेशातील पर्यटक आवर्जून हा महाल पाहण्यासाठी येतात.

काय आहे या महालाची खासियत? हा महाल श्रीमंत जिवाजीराव सिंधिया यांनी १८७४ साली बांधला. त्याचा एकूण परिसर ४० एकरांचा आहे. ४०० दालने असलेल्या या महालाचे काम करण्यासाठी परदेशातून शेकडो कारागीर आले होते. या महालाच्या भिंतीत सोन्याचांदीची कलाकारी केली गेली आहे आणि भिंतीना सोन्याचा रंग दिला गेला आहे.


नाईटहूड पदवी मिळालेले सर मायकल फिलोरी यांनी या महालाची डिझाईन तयार केली होती. दिवाणखान्यात ३५०० किलो वजनाची दोन झुंबरे आहेत. असे सांगतात की ही झुंबरे बसविण्याअगोदर छत किती भक्कम आहे याची परीक्षा घेण्यासाठी १० हत्ती ७ दिवस छतावर बांधले गेले होते. महालातील डायनिंग रूममधील टेबल इतके मोठे आहे की तेथे पदार्थ सर्व करण्यासाठी चक्क छोटी रेल्वे वापरली जाते आणि त्यासाठी टेबलवर रेल्वेचे चिमुकले रुळ आहेत.


१८७४ मध्ये जेव्हा हा महाल बांधला गेला तेव्हा २०० दशलक्ष डॉलर्स खर्च आला होता. महालात तयार केलेले म्युझियम १९६४ साली सर्वाना खुले केले गेले. ज्योदिरादित्य यांचे वडील माधवराव विमान अपघातात मृत्यू पावल्यावर ज्योतिरादित्य राजकारणात आले. सिंधिया परिवार नेहमीच जनसंघाच्या बाजूचा होता. नंतर जनसंघातून भाजप स्थापन झाला. माधवराव सिंधिया यांनी प्रथम परिवाराच्या विरोधात जाऊन कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

Leave a Comment