मुठीएवढ्या पर्सची किंमत मात्र हातभर


फोटो सौजन्य एएफटी
लग्झरी ब्रँडची क्रेझ केवळ श्रीमंताना असते असे नाही तर सर्वसामान्य माणूसही कधी ना कधी त्याच्या आवडत्या ब्रँडच्या वस्तू वापरण्याची स्वप्ने पाहत असतो. लग्झरी ब्रँडच्या वस्तू खरेदी करायच्या म्हणजे पोतेभर पैसे मोजण्याची तयारी ठेवायची. त्यामुळेच अश्या वस्तू श्रीमंत आणि सेलेब्रिटी प्रामुख्याने खरेदी करतात. अश्या वस्तू त्यांच्यासाठी स्टेटस सिम्बॉल असतात.

ब्रिटन राजघराण्याचा त्याग करून बाहेर पडलेल्या प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांच्या अनेक गोष्टींची चर्चा नेहमीच होत असते त्यात आता मेगनने एका कार्यक्रमात जाताना वापरलेल्या पर्सची भर पडली आहे. नीना बॅग असे या पर्सचे नाव असून ती अगदी छोटी म्हणजे जेमतेम सहा इंचाची आहे. तिची किंमत मात्र लाखो रुपयात असून वेबसाईटवरील माहितीप्रमाणे या पर्सची किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे.

ग्रॅब्रिला हर्स्टने डिझाईन केलेल्या या पर्सचे नामकरण आर्टिस्ट व सामाजिक कार्यकर्ती नीना सिमोन हिच्या नावावरून केले गेले आहे. ग्रॅब्रिला हर्स्ट रेडी टू वेअर कपडे आणि त्यासाठीच्या एक्सेसरीज डिझाईन करते. तिने डिझाईन केलेल्या या पर्सचा फोटो तिच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहेच. ग्रीन लेदरपासून बनविल्या गेलेल्या या पर्सला रोजगोल्ड मेटल टर्नलोक असून ही पर्स ग्रॅब्रिला हर्स्टच्या ओरिजिनल हँडबॅग कलेक्शनचा भाग आहे.

तुम्हाला अशीच पर्स हवी असेल तर ग्रॅब्रिला हर्स्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलात की तुम्हाला ही पर्स घेण्यासाठी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल याची माहिती मिळेल. ही पर्स इटली येथे तयार केली गेली आहे. तेव्हा खिसा चाचपून बघायचा आणि शक्य असेल तर पर्ससाठी नोंदणी करायची.

Leave a Comment