कोरोनाच्या भितीने ट्विटरचे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश

जगातील 100 पेक्षा अधिक देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात अडकले आहेत. जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांना देखील याचा फटका बसत आहे. टेक कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक कंपन्यांनी आपले इव्हेंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

आता मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरमध्ये जवळपास 5 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.

ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे. यासाठी कर्मचाऱ्यांना पैसे देखील मिळतील व सेटअप तयार करण्यासाठी फंड देखील मिळेल. याशिवाय कर्मचाऱ्याच्या पालकांना काही समस्या असल्यास कंपनी त्यासाठी देखील मदत करेल.

ट्विटरने सांगितले आहे की, सर्व मुलाखती या व्हिडीओ कॉन्फ्रेंसिगद्वारे घेतल्या जातील. ट्विटर व्यतिरिक्त गूगल आणि अ‍ॅपल सारख्या टेक कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment