मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिशा पटनीनंतर तारा सुतारियाची वर्णी लागली आहे. आदित्य रॉय कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ट्रेड अॅनालिस्ट आणि समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
‘एक व्हिलन’च्या सिक्वलमध्ये तारा सुतारियाची वर्णी
तारा सुतारियाची ‘एक व्हिलन’च्या सीक्वलमध्ये भूमिका गॉन गर्ल स्पेसमधील असून तिच्या भूमिके बाबत मोहित सुरी यांनी सांगितले की या चित्रपटात तारा एका गायिकेची भूमिकेत दिसणार आहे. श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या २०१४ मध्ये आलेल्या मोहित सुरी यांच्या एक व्हिलेन या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.