रेल्वे सुरक्षा दलातील भरती संदर्भातील खोटी जाहिरात व्हायरल

भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलात कॉन्सटेबल पदासाठी 19,952 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात सध्या व्हायरल होत आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी याची तयारी करत असून, परिक्षेची वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वी व्हायरल झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी परिक्षेचे फॉर्म देखील खरेदी केले.

मात्र आता रेल्वे भरती बोर्डाने ही जाहिरात बनावट अर्थात फेक असल्याचे सांगितले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांनी बुकविक्रेत्यांच्या माध्यमातून आधीच फॉर्म खरेदी केले होते.

या फॉर्म्सला 5 ते 10 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते. काही कोचिंग क्लासेसने तर याची तयारी देखील सुरू केली होती. मात्र आता भरती बोर्डाने ही माहिती फेक असल्याचे सांगितले आहे. ही माहिती समोर आल्याने अनेक विद्यार्थी मोठी फसवणूक होण्यापासून वाचले.

Leave a Comment