टीक-टॉक व्हिडीओमुळे निलंबित झालेली कॉन्स्टेबल आता झाली स्टार

काही दिवसांपुर्वी गुजरातच्या मेहसाणा येथील लहंगेनाज पोलीस स्टेशनमध्ये कामवर कार्यरत असताना टीकटॉक व्हिडीओ बनवल्याने महिला कॉन्स्टेबल अर्पिता चौधरीला निलंबित करण्यात आले होते. मात्र आता यामुळे तिचे नशीबच बदलून गेले आहे. आता अर्पिता मोठी स्टार झाली आहे.

नुकताच तिचा गुजरातील अल्बम व्हिडीओ ‘टीकटॉक नी दीवानी’ लाँच झाला आहे. या गाण्याला आतापर्यंत 16 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे.

या गाण्याला जिग्नेश कविराजने गायले असून, मनू रबारीने हे गाणे लिहिले आहे. हे गाणे लोकांना आवडल्याचे दिसत आहे.

जुलै 2019 मध्ये पोलीस स्टेशनमध्ये टीकटॉक व्हिडीओ बनवल्याने अर्पिताला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तिने आतापर्यंत 4 व्हिडीओ अल्बममध्ये काम केले असून, तिला चित्रपटांची देखील ऑफर येत आहे.

निलंबित झाल्यानंतर देखील अर्पिताची टीकटॉकची आवड कमी झाली नसून, तिचे अनेक टीकटॉक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज तिच्या याच आवडीने तिला स्टार बनवले आहे.

Leave a Comment