ज्योतिरादित्य सिंधियांच्या ताफ्यात आहेत या शानदार कार्स

काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ज्योतिरादित्य सिंधिया सध्या चर्चेत आहेत. सिंधिया राजघराण्याशी संबंध असणारे ज्योतिरादित्य सिंधिंया ग्वालियरच्या जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. आजही तेथील जनता त्यांना महाराज आणि त्यांची पत्नी प्रियदर्शनी यांना महाराणी मानतात.

374 कोटींचे मालक असलेले सिंधिया यांना राजकारणा व्यतिरिक्त कार्सची देखील आवड आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये कोट्यावधीच्या कार्स आहेत.

Image Credited – Amarujala

बीएमडब्ल्यू आयसेट्टा (BMW Isetta) –

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वर्ष 2019 मध्ये दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 374 कोटी असल्याचे सांगितले होते. यात त्यांचा राजवाडा, घर आणि व्यक्तिगत तीन कोटी रुपयांच्या एफडीआरचा समावेश आहे. त्यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कार देखील आहे. ज्याची किंमत मात्र त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलेली नाही. मात्र या कारची सध्याची किंमत जवळपास 40 लाख रुपये आहे.

आयसेट्टा एक इटालियन डिझाईन असणारी छोटी कार आहे. अंड्यासारखा आकार आणि बुडबुड्यांसारख्या खिडक्यांमुळे या कारला बबल कार म्हणून देखील ओळखले जाते. कंपनीने यात एक सिलेंडर, 4 स्ट्रोक, 247सीसी मोटारसायकल इंजिन दिले आहे. जे 13एचपी पॉवर निर्माण करते. पहिल्या आयसेट्टाला एप्रिल 1995 मध्ये सादर केले होते.

Image Credited – Amarujala

लँड रोव्हर रेंज रोव्हर –

ज्योतिरादित्य सिंधिया नवी दिल्लीत अनेकदा लँड रोव्हर रेंज रोव्हरमधून प्रवास करताना दिसतात. या एसयूव्हीमध्ये 4999सीसी चे 8 सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. या गाडीत 8 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स मिळतो. या एसयूव्हीची टॉप स्पीड 225 किमी आहे. अवघ्या 5.8 सेंकदात एसयूव्ही 0 ते 100 किमीचा वेग पकडते. या एसयूव्हीची किंमत जवळपास 2 कोटी आहे.

Image Credited – Amarujala

टाटा सफारी  –

सिंधिया यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या असल्या तरी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना अनेकवेळा टाटा सफारीमधून प्रवास करताना पाहण्यात आले. निवडणुकीत ग्रामीण भागात प्रचार करताना टाटा सफारी फायदेशीर ठरते.

कारच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यात 2,179सीसी 4 सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 138 बीएचपी पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. कंपनीने आता कारला बंद केले आहे.

Leave a Comment