शेकडो अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणाऱ्या निर्मात्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा


गेल्या दोन वर्षात ‘# मी टू’ या चळवळीअंतर्गत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल १०० पेक्षा अधिक प्रतिष्ठित अभिनेत्रींनी हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते ते आरोप अखेर सिद्ध झाले आहेत. हार्वेला या आरोपाखांली २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हार्वेविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप अभिनेत्रींपैकी लॉरेन यंग, टॅरेन वुल्फ, डॉन डनिंग, मिरियम हॅले, अ‍ॅनाबेला सायरोरा या पाच अभिनेत्रींनी केलेले आरोप न्यायालयात सिद्ध झाले असून हार्वेला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अभिनेत्रींना चित्रपटात काम मिळवून देण्याचे अमिष दाखवून हार्वेने त्यांच्यावर अत्याचार केले. हार्वेवर या अभिनेत्रींनी थर्ड डिग्री रेपचा आरोप केला होता. हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत.

हार्वेवरील बलात्काराचे आरोप गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीतच सिद्ध झाले होते. पण त्याला शिक्षा सुनावण्याआधीत त्याच्या छातीत दुखायला लागल्यानंतर हार्वेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याची प्रकृती आता सुधारली असल्यामुळे त्याची रवानगी आता रुग्णालयातून थेट तुरुंगात करण्यात येणार आहे.

Leave a Comment