डॉक्टरांनी एचआयव्हीच्या औषधांद्वारे कोरोनाच्या रुग्णाला केले बरे !

राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले अनेक रुग्ण आढळले आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये (एसएमएस) कोरोनाचे रुग्ण भरती आहेत. येथील डॉक्टरांना एका कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या महिलेला एचआयव्ही, स्वाइन फ्लू आणि मलेरियाच्या औषधांनी ठीक केले आहे.

कोव्हिड-19 टेस्टमध्ये या महिलेचा रिपोर्ट आता नेगेटिव्ह आला आहे. ही महिला 23 सदस्यांच्या इटालियन ग्रुपसह राजस्थानला आली होती. ज्यातील अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

या ग्रुपमध्ये महिलेच्या पतीलाच सर्वात प्रथम कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. दुसऱ्या दिवशी महिलेला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर एसएमएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिलेवर एचआयव्हीच्या औषधांनी उपचार केले.

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही त्यांना लोपिनाविर 200mg/रिटोनाविर 50mg चा डोस दिवसातून दोनदा दिला. याशिवाय डॉक्टरांनी स्वाइन फ्लूसाठी असलेले ओस्लेटामिविर आणि मलेरियामध्ये वापरले जाणारे क्लोरीकीन देखील दिले.

या उपचाराचा महिलेवर परिणाम दिसून आला आहे. मात्र महिलेच्या 69 वर्षीय पतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार अद्याप सुरू आहेत. डॉक्टर डी एमस मीणा यांनी सांगितले की, महिलेच्या पतीला फुफ्फुसांचा आजार आहे, म्हणून त्याच्या रिकवरीसाठी वेळ लागत आहे. मात्र, त्यांची प्रकृतीही आता स्थिर आहे.

Leave a Comment