खडसेंचा पत्ता कट करत या नेत्याला मिळाली राज्यसभेची उमेदवारी


नवी दिल्ली : पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून भाजपकडून खडसेंना राज्यसभेत पाठवले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नाही. तर भाजपने डॉ. भावत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही यादी भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर जाहीर करण्यात आली होती. तर अमरीश पटेल यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने या आधी पहिली यादी जाहीर केली होती. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आल्यामुळे दुसऱ्यांदा मावळते खासदार संजय काकडे यांना उमेदवारी मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment