कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात वेगाने होत आहे. यामुळे भारतीयांच्या मनात आहारासंबंधी देखील भिती निर्माण झाली आहे. मांसाहारामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, अशी भिती भारतीयांच्या मनात आहे. त्यामुळे याचा परिणाम व्यवसायावर देखील झाला आहे.
मांसाहारामुळे होऊ शकतो का कोरोनाचा संसर्ग ?
काही दिवसांपुर्वी सरकारने मटन आणि चिकन पुर्णपणे शिजवून खाण्याचा सल्ला दिला होता. म्हणजेच मांसाहार अर्धे शिजलेले नसावे. मांसाहारामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र पुर्ण जगात याबाबत चर्चा सुरू असल्याने मांसाहार काही काळासाठी खाणे टाळणे गरजेचे आहे.
मांसाहारामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. याचा कोणताही ठोस पुरावा नाही. मात्र आरोग्य मंत्रालयाच्या एडवाइजरीची अर्थ एवढाच आहे की प्राण्यांच्या मांसामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. कच्चे मांस आणि अंड्यांमुळे या आधी देखील अनेक फ्लू पसरलेले आहेत.
अंडी अथवा कोंबडीमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अद्याप एकही उदाहरण समोर आलेले नाही. चीनमध्ये देखील माणसांपासून एकमेंकाना कोरोनाची लागण होत आहे.
या व्हायरसचा फटका कुकुटपालन व्यवसायाला बसला आहे. अफवेमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला असून, अंडी आणि चिकनची किंमत 15 ते 30 टक्क्यांनी कमी झाली आहे.