एवढ्या तपासणीनंतरही भारतात कसे घुसत आहेत कोरोनाग्रस्त ?

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 70 च्या पुढे गेली आहे. विमानतळावरील कडक तपासणीनंतर देखील हे रुग्ण भारतात कसे घुसत आहेत ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भातील प्रश्नांना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी उत्तरे दिली आहेत.

हर्षवर्धन यांनी सांगितले की, विमानतळावर स्क्रिनिंगची प्रक्रियेला समजवताना त्यांनी सांगितले की, केस पॉजिटिव्ह मिळाली याचा अर्थ असा नाही की स्क्रिनिंगमध्ये निष्काळजीपणा झाला आहे. अनेक प्रकरणात रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाचे लक्षण डेव्हलप होतात. त्यामुळे सरकार स्क्रिनिंगनंतर देखील संशयित रुग्णांची तपासणी करत आहे.

विमानतळावर असे होते थर्मल स्क्रिनिंग –

जेव्हा एखादा प्रवासी बाहेरून येतो, तेव्हा तो सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरतो. यानंतर त्याचे थर्मल स्क्रिनिंग होते. त्याचे पार्श्वभुमी, लक्षणे आणि थर्मल स्क्रिनिंग तपासले जाते. कोरोनाचे लक्षण असणाऱ्या रुग्णांना त्याच वेळी वेगळे केले जाते. जर काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच संशय असेल तर त्यांची यादी तयार केली जाते. या सर्व प्रवाशांचा डाटा गोळा केला जातो.

हर्षवर्धन यांनी सांगितले की, स्क्रिनिंगमध्ये रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर देखील अनेकदा ते पॉजिटिव्ह असू शकते. अशा सर्व संशयित रुग्णांची माहिती देशातील सर्व जिल्ह्यांच्या सर्व्हिलांस अधिकारी आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिली जाते.

देशातील जवळपास 30 ते 35 हजार लोक कम्युनिटी सर्व्हिलांसमध्ये आहेत व त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिले जात आहे.  कम्यूनिटी सर्व्हिलांस एवढे जबरदस्त आहे की 4 दिवसानंतर देखील लक्षणे आढळल्यास त्यांना वेगळे केले जाते. दररोज प्रत्येक राज्यातून एक सविस्तर रिपोर्ट येत असतो.

आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, विमानतळावर 4 विमाने एकसोबत आल्यानंतर देखील थर्मल स्क्रिनिंग शक्य आहे. त्यांनी स्वतः तीन विमानतळांवर जाऊन याची तपासणी केली. सध्या 30 विमानतळांवर स्क्रिनिंग केली जात आहे.

त्यांनी सांगितले की, प्रत्येक लॅबमध्ये हा व्हायरस टेस्ट होत नाही. पुण्यात सेंट्रल रेफरेंस लॅब आहे. या व्यतिरिक्त 15 असे आणखी लॅब सुरू करण्यात आले आहेत. देशभरात 51 लॅब आणि 56 ठिकाणी कोरोना व्हायरसच्या नमून्यांचे कलेक्शन सेंटर उभारण्यात आले आहेत.

Leave a Comment