शहर पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये 1100 फूट उंचीवर तयार केला Viewing प्लॅटफॉर्म

एखाद्या ठिकाणी उभे राहून संपुर्ण शहर पाहता यावे, असे एखादे ठिकाण प्रत्येक शहरात हवे, असे प्रत्येकाला वाटत असते. याचीच सुरूवात आता न्यूयॉर्क शहरामध्ये झाली आहे.

Image Credited – Business Insider

न्यूयॉर्कच्या हडसन याडर्स बिल्डिंगमध्ये 1100 फूट उंचावर संपुर्ण शहर पाहण्यासाठी व्यूइंग प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म पुर्णपणे काचेचा आहे. येथे उभे राहून तुम्ही शहरातील सर्व प्रसिद्ध ठिकाण जसे की, एम्पायर स्टेट बिल्डिंग, क्रिय्सलर बिल्डिंग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, स्टॅच्यू ऑफ लिब्रेटी आणि सेंट्रल पार्क देखील येथून पाहू शकता.

Image Credited – archyde

येथे 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी 31 रुपये आणि इतरांसाठी 38 रुपये तिकीट आहे. तसेच 16 डॉलर अतिरिक्त दिल्यास शँपेन देखील देण्यात येईल. 11 मार्चपासून हा व्यूइंग पॉइंट लोकांसाठी उघडण्यात आला आहे.

Leave a Comment