फोटो सौजन्य पत्रिका
जगात शेकडो प्रकारची मांजरे आहेत आणि लोक मोठ्या आवडीने मांजरे पाळतात. जगातील सर्वात सुंदर मांजर कोण याचे फोटो अनेकदा झळकतात पण जगातील सर्वात भीतीदायक मांजराचे फोटो कुठे झळकणार असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर येथे मिळेल, स्वित्झर्लंडच्या रुटी येथे राहणारी एक मांजर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २२ हजाराहून अधिक फॉलोअर् आहेत. या मांजरीचे नाव एक्सझर्द्न (xherdan) असे आहे. तिचे वैशिष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकाही केस नाही आणि भरपूर सुरकुत्या आहेत. त्यामुळे तिचे प्रथम दर्शन कुणालाही घाबरविते.
भीतीदायक वाटणारे पण अतिशय प्रेमळ मांजर
सांड्रा फिलीप ही या मांजराची मालकीण सांगते, जेव्हा तिने प्रथम हे मांजर पहिले तेव्हा ती त्यांच्या प्रेमातच पाडली. दिसायला ते भयानक वाटते पण अतिशय प्रेमळ आणि खेळकर आहे. सांड्राच्या मते हे जगातील सर्वत सुंदर मांजर आहे. लोक त्याची एलियन, ब्रेन म्हणून हेटाळली करतात ते तिला मुळीच आवडत नाही. सांड्रा तिला शॉपिंगला घेऊन जाते, तिला केस नसले तरी ब्रश करते, पेडिक्युअर करते. या मांजराची काळजी खूप घ्यावी लागते त्यामुळे सांड्रा तिचे डोळे, दात, कान स्वच्छ ठेवते. तिच्या मते हे मांजर एखाद्या निरागस बाळाप्रमाणे आहे.