… म्हणून झाडाला उलटे लटकते वटवाघूळ

तुम्ही वटवाघळांना उलटे लटकताना अनेकदा पाहिले असेल. सस्तन प्राणी असलेले वटवाघूळ निशाचर असते. झाडे आणि गुहेत वटवाघूळ उलटे लटकलेले असते. मात्र हे सरळ न बसता, असे उलटे का लटकलेले असतात, हे तुम्हाला माहिती आहे का ? याच्यामागे एक मोठे कारण आहे. याविषयी जाणून घेऊया.

वटवाघूळ हा एकमेव असा सस्तन जीव आहे, जो उडू शकतो. जगभरात वटवाघळांच्या 1000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती तर अशा आहेत, ज्या केवळ रक्त पितात. यामुळे त्यांना पिशाच वटवाघूळ देखील म्हटले जाते.

जगभरात आढळणाऱ्या वटवाघळांमध्ये अधिकांश तपकिरी आणि काळ्या रंगाचे आहेत. वैज्ञानिकांनुसार वटवाघूळ जवळपास 10 कोटी वर्षांआधी डायनासोरच्या काळापासून पृथ्वीवर आहेत.

वटवाघूळ उलटे लटकण्याचे कारण हे आहे की, ते यामुळे सहजपणे उडू शकतात. इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघूळ जमिनीवरून उड्डाण घेत नाही. कारण इतर पक्ष्यांप्रमाणे त्यांचे पंख उडण्यास एवढे सक्षम नसतात. याशिवाय त्यांचे पाय लहान आणि अविकसित असतात, ज्यामुळे ते धावून गती पकडू शकत नाहीत.

वटवाघूळ उलटे लटकल्यानंतर देखील त्यांचे संतुलन कायम कसे राहते ? असा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्या. त्यांच्या रक्तवाहिन्या अशा प्रकारे विकसित झालेल्या असतात की, त्यांचे वजनच त्यांच्या पंज्याला घट्टपणे पकडून ठेवण्यास मदत करतात.

Leave a Comment