आता अनेक डिव्हाइसवर वापरता येणार एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर आणत आहे. कंपनीने नुकतेच डार्क मोड हे फीचर रोल आउट केले आहे. आता कंपनी आणखी काही खास फीचर आणणार आहे. यामध्ये मल्टीपल डिव्हाइस सपोर्ट, लास्ट सीन फॉर सिलेक्ट फ्रेंड्स सारख्या फीचर्सचा समावेश आहे. भविष्यात हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पाहायला मिळतील.

सेक्युर चॅट बॅकअप्स –

सध्या युजर्सची चॅट हिस्ट्री आयक्लाउट अथवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह होते. मात्र याला एनक्रिप्शन नसते. कंपनी आता एक खास फीचर आणणार आहे, ज्याद्वारे युजर्स चॅटचे बॅकअप घेण्याआधी आणि त्याला सेव्ह करण्यापुर्वी एनक्रिप्ट करू शकतील.

लास्ट सीन फॉर सेलेक्ट फ्रेंड्स –

कंपनी लवकरच हे फीचर रोल आउट करणार असून, यामध्ये काही ठराविक कॉन्टॅक्ट्साठी तुमचे लास्ट सीन लपवू शकता.

डिस्पेअरिंग मेसेज –

या फीचरद्वारे ठराविक वेळेनंतर तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील. यासाठी तुम्ही स्वतः वेळ निवडू शकता.

फेस आयडी सपोर्ट –

अँड्राईड युजर्ससाठी या प्लॅटफॉर्मवर फिंगरप्रिंट लॉक फीचर देण्यात आलेले आहे. आता लवकरच युजर्सला फेस आयडी सपोर्ट देखील मिळेल. सध्या या फीचर्सचे टेस्टिंग सुरू आहे.

मल्टीपल डिव्हाइस सपोर्ट –

या फीचरद्वारे युजर्स अनेक डिव्हाइसवर एकच अकाउंट वापरू शकतील. एकसोबत अनेक स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर फायदेशीर ठरेल. मात्र अद्याप कंपनीने या फीचरबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

Leave a Comment