भारतातील हे पुल पाहण्यासाठी येतात विदेशी पर्यटक

भारतात शेकडो असे पुल आहेत, जे खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. भारतातील काही पुल केवळ रस्त्यांना जोडण्यासाठी नाहीतर आपल्या आर्किटेक्चरल स्ट्रक्चर आणि खास तंत्रासाठी ओळखले जातात. हे पुल पाहण्यांसाठी लांबून लोक येतात. अशा काही पुलांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

विद्यासागर सेतू –

हावडा आणि कोलकत्ताला जोडण्यासाठी हुगली नदीवर विद्यासागर सेतूचे निर्माण करण्यात आले आहे. हा पुल केबलवर लटकला असल्याने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खास आहे. हा पुल दिसण्यास देखील सुंदर आहे. 457 मीटर लांब आणि 35 मीटर रुंद या पुलाचे काम 1978 मध्ये सुरू झाले होते व 1992 मध्ये पुर्ण झाले. या पुलावरून दररोज 85 हजार वाहने प्रवास करतात.

Image Credited – Amarujala

कोरोनेशन ब्रिज –

कोरोनेशन ब्रिज पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगच्या जिल्ह्यातील तीस्ता नदीच्या वरती बनविण्यात आला आहे. 1941 मध्ये या पुलाच्या निर्मितीसाठी 4 लाख रुपये खर्च आला होता.

Image Credited – Amarujala

वेम्बनाड रेल्वे ब्रिज –

केरळच्या कोच्ची येथील वेम्बनाड रेल्वे ब्रिज भारतातील सर्वात सुंदर पुलांपैकी एक आहे. हा पुल कोच्चीतील अडापल्ली आणि वल्लारपदम यांना जोडतो. 4.62 किमी लांबीचा हा पुल भारतातील सर्वात लांब रेल्वे पुलांपैकी एक आहे. हा पुल वेम्बनाड तलावाच्या तीन बेटांमधून जातो.

Leave a Comment