कोण होते निकोला टेस्ला ?

निकोला टेस्ला हे नाव जगातील महान वैज्ञानिकांमध्ये घेतले जाते. त्यांनी अनेक असे अविष्कार केले, ज्यांचा वापर आज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आज करत आहोत. टेस्लांना एक रहस्यमयी वैज्ञानिक देखील म्हटले जाते. सांगण्यात येते की, त्यांनी टाइम ट्रॅव्हल केले होते. एका रिपोर्टनुसार, ते स्वतः म्हणाले होते की त्यांनी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ तिन्ही एकसोबत पाहिले आहेत. या संदर्भात त्यांनी एक पुस्तक देखील लिहिले होते.

वर्ष 1856 मध्ये जन्म झालेले टेस्ला वैज्ञानिक असण्याबरोबरच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि फिजिकल इंजिनिअर देखील होते. थॉमस एडिसन आणि निकोला टेस्ला हे एकमेंकाचे प्रतिस्पर्धी देखील होते.

Image Credited – Amarujala

टेस्ला यांनी वर्ष 1891 मध्ये टेस्ला कॉइल्सचा शोध लावला. टेस्ला कॉइल्स एक प्रकारचे इलेक्ट्रिक सर्किट असते. ज्याच्या मदतीने कमी करंट आणि हाय वॉल्टेज वीज निर्माण होते. आज याचाच वापर उपकरणांमध्ये होतो. वायरलेस ट्रांसमिशनमध्ये देखील याचा वापर होतो.

Image Credited – Amarujala

टेस्ला यांनी न्यूयॉर्कच्या नायग्रा फॉल्समध्ये हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट डिझाईन तयार केले. 3 वर्षानंतर 16 नोव्हेंबर 1896 ला पहिल्यांदा या प्लांटद्वारे आजुबाजूच्या भागात वीज पुरवठा करम्यात आला. या कामगिरीसाठी नियाग्रा फॉल्स समोरील गॉट आयलँडवर निकोला टेस्लांची एक प्रतिमा स्थापन केली गेली.

Image Credited – Amarujala

1889 मध्ये त्यांनी एसीद्वारे चालणारी एक मोटार देखील बनवली होती. रेडिओचा शोध देखील मार्कोनी यांच्या ऐवजी टेस्ला यांनी केल्याचे सांगितले जाते. मात्र 13 मार्च 1895 ला त्यांच्या लॅबमध्ये आग लागली. टेस्ला यांच्या मृत्यूनंतर मार्कोनी यांचे रेडिओचे पेटेंट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत, हे पेटेंट टेस्ला यांना दिले. वर्ष 1898 मध्ये टेस्ला यांनी एक रिमोटवर चालणारी नाव देखील तयार केली होती.

Leave a Comment