एलआयसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार 30 हजाराच्या पुढे

एलआयसीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. एलआयसीमध्ये असिस्टेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह पदासाठी 168 जागा आणि असिस्टेंट इंजिनिअर पदासाठी 50 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

या पदांसाठी उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष आणि कमाल 30 वर्ष असणे गरजेचे आहे. पदानुसार, शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

अर्जाचे शुल्क एससी, एसटी उमेदवारांसाठी 85 रुपये असून, इतर उमेदवारांसाठी 700 रुपये आहे. अर्ज भरण्यास 25 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 15 मार्च 2020 आहे.

ऑनलाईन परिक्षेची तारीख 4 एप्रिल असून, उमेदवार परिक्षेचे एडमिट कार्ड 27 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान वेबसाईटवरून काढू शकतात.

उमेदवारांची निवड ऑनलाईन परिक्षेच्या आधारावर होईल. ऑनलाईन अर्जासाठी व इतर माहितीसाठी उमेदवार वेबसाईटला भेट देऊ शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना 32,795 रुपये पगार मिळेल.

Leave a Comment