आता सर्व विमा पॉलिसीमध्ये मिळणार कोरोनाच्या खर्चाचा लाभ

चीन पाठोपाठ भारतातही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आता या पार्श्वभुमीवर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसचा मेडिकल कव्हर जोडण्याचे आदेश दिले आहेत. इरडाने कंपन्यांना स्पष्ट केले आहे की, ज्या विम्यात हॉस्पिटलच्या खर्चाचा समावेश आहे. त्यात कोरोना व्हायरसच्या खर्चाचा समावेश करण्यात यावा.

याआधी इरडाने विमा कंपन्यांना कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी खर्चाच समावेश असणाऱ्या पॉलिसी आणण्यास सांगितले होते. इरडाने निर्देश दिले आहेत की, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा खर्च आणि क्वारंटीन पिरियड दरम्यान उपचाराचा खर्च पॉलिसीच्या नियम आणि अटींनुसार सध्याच्या नियामक साच्यात समावेश करावा.

तसेच, कोरोना व्हायरसच्या उपचारांशी संबंधित दाव्यांचे त्वरित निराकरण करण्याचे देखील आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment