ही आहे जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्था

जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्थांचा उल्लेख होतो, त्यावेळी इस्त्रालयाची गुप्तचर संस्था ‘मोसाद’चा उल्लेख होतो.  ही एक अशी गुप्तचर संस्था आहे, ज्याला मोठमोठे दहशतवादी देखील घाबरतात. मोसादच्या एजेंट्सनी जगभरातील अशक्य वाटणारे ऑपरेशन देखील यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत. याच कारणामुळे मोसादला जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्था मानले जाते.

Image Credited – Amarujala

मोसादचे मुख्यालय इस्त्रालयातील तेल अवीव या शहरात आहे. या संस्थेची स्थापना 13 नोव्हेंबर 1949 ला सेंट्रल इंस्टिट्यूशन फॉर कॉ-ऑर्डिनेशन म्हणून झाली होती. ही इस्त्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे.

Image Credited – Amarujala

मोसाद आपल्या शत्रूला जगभरातील कोपऱ्या कोपऱ्यात शोधून मारते. असे अनेक ऑपरेशन मोसादने दुसऱ्या देशात जाऊन केलेत.

Image Credited – Amarujala

मोसादने युगांडामध्ये जाऊन ऑपरेशन एंटेबे यशस्वीरित्या पुर्ण केले होते. 1976 मध्ये युगांडाच्या विमानतळावर विना परवानगी घुसून मोसादने दहशतवाद्यांचा खात्मा केला होता व 54 इस्त्रायली नागरिकांना सोडवले होते.

Image Credited – Amarujala

इस्त्रायलचा एक गुप्तहेर एली कोहेन तर जगभरात प्रसिद्ध आहे. एली कोहेनला इस्त्रायलचा सर्वात शूर आणि साहसी हेर म्हटले जाते. कोहेन थेट सीरियाचा संरक्षणमंत्री बनणार होता, मात्र आपल्या एका चुकीमुळे पकडला गेला. त्यानंतर भर चौकात त्याला फासावर लटकवण्यात आले.

Leave a Comment