लवकरच भारतात पाहायला मिळणार ‘मेक इन इंडिया’ प्लाईंग कार

गेल्या अनेक दिवसांपासून हवेत उडणाऱ्या कारची चर्चा सुरू आहे. परदेशात याची चाचणी देखील सुरू आहे. मात्र आता लवकरच भारतात उडणारी कार पाहायला मिळणार नाही. खास गोष्ट म्हणजे ही कार मेक इन इंडिया असेल. उडणारी कार बनविणारी कंपनी पीएएल-व्हीने (PAL-V) सांगितले आहे की, कंपनी गुजरातमध्ये या कारची निर्मिती करेल. या कारला कंपनीने 2018 मध्ये जिनिव्हा मोटार शो मध्ये सादर केले होते.

कंपनी या कारचे प्रोडक्शन 2021 पर्यंत सुरू करेल. कंपनीला जवळपास 100 कार्सचे एडवांस बुकिंग देखील मिळाले आहे. या कार्सना अमेरिकासह यूरोपियन देशात निर्यात केले जाईल. याशिवाय कंपनी काही कार फिल्म इंडस्ट्रीसाठी देखील बनवणार आहे.

Image Credited – Amarujala

कंपनीचे म्हणणे आहे की ही कार तीन चाकी असेल, ज्यात हॅलिकॉप्टरचे मिनिएचर मॅकेनिज्म असेल. या कारची किंमत 4.3 कोटी रुपये आहे.

या कारची बॉडी कार्बन फायबरची असेल. तर आतील भाग अ‍ॅल्युमिनियम आणि टायटेनियमचा असेल. या कारचे वजन केवळ 680 किलो असेल. कारला टेकऑफ करण्यासाठी 165 मीटर जागेची गरज असेल. या गाडीच्या वरच्या बाजूला रिअर प्रोपेलर असेल, ज्यांना गरज नसल्यावर काढता देखील येईल. या प्रोपेलरच्या मदतीने कार 12,500 फूट उंच उड्डान घेऊ शकते.

Image Credited – Amarujala

या कारला चालविण्यासाठी गॅसोलिनची गरज असेल. या कारचा टॉप स्पीड ताशी 322 किमी असेल. तर रस्त्यावर ही कार ताशी 180 किमी वेगाने धावेल. कारमध्ये 230 हॉर्स पॉवर असणारे 4 सिलेंडर इंजिन आहे व यात 2 जण सहज बसू शकतात. यात व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिगचे फीचर नाही.

Image Credited – Amarujala

कार 10 मिनिटांमध्ये तीन सीटवरून दोन सीट असणाऱ्या गायरोकॉप्टरमध्ये बदलते. कारला 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यासाठी केवळ 8 सेंकद लागतात. या कारला जगातील पहिली ड्राईव्ह अँड प्लाय कार म्हटले जाते. कारमध्ये बाईकप्रमाणे हँडल देखील आहे. कारला खरेदी करण्यासाठी चालकाकडे पायलट आणि ड्रायव्हिंग असे दोन्ही लायसन्स असणे आवश्यक आहे.

कारमध्ये 102 लीटरचा फ्यूल टँक असेल, ज्याद्वारे हवेत एकावेळी 500 किमी अंतर पार करता येईल. तर रस्त्यावर कार एकावेळी 1200 किमी अंतर पार करू शकते.

Leave a Comment