जाणून घ्या कोणकोणत्या डिव्हाइसवर लॉग इन आहे तुमचे फेसबुक अकाउंट

सोशल मीडिया वापरताना आपली खाजगी माहिती आणि सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपण वेगवेगळ्या डिव्हाईसवरून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारखे सोशल मीडिया अकाउंट लॉग इन करत असतो व ते अकाउंट तसेच सुरू राहतात. अशा परिस्थितीत दुसरी व्यक्ती ते अकाउंट वापरून कोणतेही गैरकृत्य करू शकते. तुमचे फेसबुक अकाउंट कोणकोणत्या डिव्हाइसवर सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकता.

यासाठी सर्वात प्रथम फेसबुकच्या सेटिंग्समध्ये जाऊन सेक्युरिटी आणि लॉगइन पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘Where You’re logged In’ हा पर्याय दिसेल.

येथे तुम्हाला तुमचे अकाउंट ज्या ज्या डिव्हाइसमध्ये सुरू आहे, ते डिव्हाइस दिसतील. या डिव्हाइसच्या नावासोबतच तुम्हाला वेळ देखील दिसेल. याद्वारे तुमचे अकाउंट किती वाजता सुरू होते, याची देखील माहिती मिळेल.

दुसऱ्या डिव्हाइसवरील अकाउंट लॉग इन करण्यासाठी तुम्हाला लॉग इन असलेल्या डिव्हाइस यादीच्या समोर तीन डॉट दिसतील. या डॉटवर क्लिक केल्यानंतर लॉग आउटचा पर्याय दिसेल. तुम्ही एक-एक डिव्हाईस देखील लॉग आउट करू शकता अथवा सर्व डिव्हाईस लॉग आउट करण्यासाठी ‘Log Out of all Session’ पर्यायावर देखील क्लिक करू शकता.

Leave a Comment