बजाज लाँच करणार स्वस्त ई-स्कूटर

बजाज ऑटो भारतीय बाजारात एक सिंगल सीटर, लो पॉवर आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी या स्कूटरला इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिस स्टार्टअप युलूसाठी तयार करत आहे. खास गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 35 हजारांपेक्षा कमी असेल.

नोव्हेंबर 2019 मध्ये बजाज ऑटोने बाइक शेअरिंग स्टार्टअपमध्ये 8 मिलियन डॉलरचे शेअर खरेदी केले आहेत.  त्यामुळे बजाज पुढील वर्षीपर्यंत 30 ते 35 हजार रुपयांपर्यंतची इलेक्ट्रिक स्कूटर युलूसाठी लाँच करण्याची तयारी करत आहे.

Image Credited – deccanherald

युलूचे संस्थापक आणि सीईओ अमित गुप्ता म्हणाले की, आम्ही जवळपास 600 डॉलर प्रत्येक बाईकवर खर्च करत आहोत. आम्ही याला चीनमध्ये बनवत असून, भारतात एसेंबल करणार आहोत. बजाज ऑटो सोबत आल्याने किंमत 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत करू शकतो.

Image Credited – travel2karnataka

युलूच्या या स्कूटरमध्ये 48V ची स्कूटर देण्यात आली आहे व याची टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे. फुल चार्जिंग केल्यानंतर ही स्कूटर 60 किमी अंतर पार करू शकते. ही बाईक चालविण्यासाठी लायसन्सची देखील गरज नाही. कंपनी बाईक चालविण्यासाठी तासाला 10 रुपये आकारते.

सध्या या स्टार्टअपकडे 4 हजार इलेक्ट्रिक वाहन असून, कंपनीचे लक्ष्य या वर्षाअखेर 1 लाख इलेक्ट्रिक स्कूटर करण्याचे आहे. कंपनी सुरूवातीला केवळ 4 ते 5 शहरांमध्येच या स्कूटरची विक्री करेल.

Leave a Comment