कोरोनापासून बचावासाठी हा चालक वाटत आहे मोफत मास्क

कोरोना व्हायरसचा प्रसार आता भारतात देखील होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हँड सॅनिटायजर आणि मास्कचे भाव देखील वाढले आहेत. यातच बंगळुरूमधील एक टॅक्सी चालक चर्चेचा विषय ठरला आहे. हा चालक आपल्या प्रवाशांना मोफत मास्क वाटत आहे.

बंगळुरू येथील चालक आजम खान हे आपल्या टॅक्सीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना मोफत मास्क देत आहेत. एका व्यक्तीने काही दिवसांपुर्वी आजम खान यांना मास्क गिफ्ट केला होता. त्यानंतर खान यांनी देखील असेच करण्याचा विचार केला व ते लोकांना कोरोनाबाबत जागृक करू लागले.

खान दररोज 10 पेक्षा अधिक मास्क वाटतात. एका मास्कची किंमत 30 ते 40 रुपये असल्याचे सांगितले जाते. खान यांनी सांगितले की, ते आधी प्रवाशांना विचारतात की त्यांच्याकडे मास्क आहे की नाही. जर प्रवाशांकडे मास्क नसेल तर ते त्यांना मोफत मास्क देतात.

खान सांगतात की, कॅबमध्ये अनेक प्रकारची लोक येतात. हे एक प्रकारे सार्वजनिक ठिकाणच आहे. अनेकदा विमानतळावर देखील जातो. या व्हायरसपासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी मी घेतो व लोकांना देखील त्याबाबत सांगत आहे.

 

Leave a Comment