उत्तर-पुर्व केनियाच्या ग्रासिया काउंटी येथे शिकाऱ्यांनी अतिशय दुर्मिळ पांढऱ्या जिराफ मादी आणि तिच्या पिल्लाची शिकार केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या दुर्मिळ पांढऱ्या जिराफांचे शव सापडले आहेत. या प्रजातीचे जगात केवळ तीनच जिराफ होते व आता यातील केवळ एकच शिल्लक आहे.
जगातील सर्वात दुर्मिळ पांढऱ्या जिराफांची शिकार
या जिराफांचा पांढरा रंग हा ल्युसीज्म नावाच्या दुर्मिळ स्थितीमुळे येतो. ज्यामुळे त्वचेच्या पेशींमध्ये रंगद्रव्य नसते. या जिराफांचा फोटो 2017 मध्ये व्हायरल झाला होता.
इशाकबीनी हिरोला कम्युनिटीचे व्यवस्थापक मोहम्मद अहमदनूर यांनी सांगितले की, शिकार करण्यात आलेल्या जिराफांना याआधी तीन महिन्यांपुर्वी पाहण्यात आले होते. ही केनियासाठी वाईट गोष्ट आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जिराफांना मारणाऱ्या शिकाऱ्यांची माहिती मिळालेली नाही. या संदर्भात तपास सुरू आहे.