पुण्यातील दोन रिक्षाचालकांनी आपल्या ईमानदारीने सर्वांचे मन जिंकले आहे. दोन रिक्षा चालकांना तब्बल 7.5 लाख रुपये किंमत असलेली सोन्याची बॅग सापडली होती. मात्र दोघांनीही प्रामाणिकपणा दाखवत ही बॅग पोलिसांना दिली व त्यानंतर पोलिसांनी सोने खऱ्या मालकापर्यंत पोहचवले.
ईमानदारी दाखवत रिक्षाचालकाने परत केले सापडलेले 7.5 लाखांचे सोने
रिक्षाचालक अतुल टिळेकर आणि भरत भोसले पुणे रेल्वे स्टेशन जवळ प्रवाशांची वाट पाहत उभे होते. तेव्हा त्यांना पार्किंग बुथजवळ सोने भरलेली बॅग सापडली.
त्यानंतर दोघांनीही ही बॅग रेल्वे स्टेशनवर तैनात पोलीस कर्मचाऱ्याला सोपवली. पोलिसांनी सांगितले की, टिळेकर आणि भोसले यांनी ही बॅग आम्हाला दिल्यानंतर याचे खरे मालक दीपक चित्राला यांना सोपविण्यात आली आहे. त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
भोसलेंनी सांगितले की, आम्ही प्रवाशांची वाट पाहत असताना आम्हाला ही बॅग सापडली. बॅग सापडल्याच्या आनंदात खऱ्या मालकाने आम्हाला बक्षीस म्हणून काही पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आम्ही त्यास नकार दिला.