शेकडो प्रकारे कथेचा शेवट होऊ शकणाऱ्या पुस्तकाची गिनीज नोंद


फोटो सौजन्य नई दुनिया
कोणत्याची पुस्तकात लिहिल्या गेलेल्या कथेचा शेवट किती प्रकारे करता येऊ शकेल असा प्रश्न जर कुणी विचारला तर त्याचे उत्तर चार किंवा पाच इतकेच असू शकेल. पण शेकडो प्रकारे कथेचा शेवट करता येईल अश्या एका पुस्तकाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नुकतीच घेतली गेली आहे. श्रीलंकेतील कोलंबो गॅजेट मध्ये या संदर्भात बातमी आली आहे. त्यानुसार लेखक कलाकार विटासिंघे यांनी लहान मुलांसाठी हे ‘वंडर क्रिस्टल’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

या पुस्तकातील कथेचा शेवट १२५० विविध प्रकारे करता येईल असा उल्लेख रिपोर्टमध्ये केला गेला आहे. गुरुवारी हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, त्याना रचनात्मक करण्यास प्रोत्साहन मिळाले हाच मुळी हे पुस्तक लिहिण्यामागचा लेखकाचा हेतू होता. मुलांनी विविध प्रकारे ही कथा पूर्ण करताना लेखन, चित्रे, कवितेच्या माध्यमांचा वापर करावा अशी अपेक्षा होती. त्यानुसार १२५० प्रकारे ही कथा पूर्ण केली गेली असे समजते. या पुस्तकची नोंद गिनीज मध्ये झाल्यावर ट्विटरवर कॉमेंटचा अक्षरश पाउस पडला आहे.

Leave a Comment