राष्ट्रपती शी जीनपिंग यांची वुहानला भेट


फोटो सौजन्य जागरण
चीनच्या वुहान शहरातून जगभरातील ११२ देशात पसरलेल्या करोना विषाणू मुळे मरण पावलेल्यांची संख्या फक्त चीन मध्ये ३१३६ वर गेली असताना चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी वुहानला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. विशेष म्हणजे या शहरात डिसेंबर मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता मात्र जीनपिंग यांची वुहानची ही पहिली भेट आहे. जगभरातून करोनाविषयी आणि चीनमधून त्याचा फैलाव होण्याविषयी विविध तर्क व्यक्त होत असतानाही जीनपिंग यांनी मात्र त्याबाबत पूर्ण मौन बाळगले होते.

सोमवार अखेर चीन मध्ये करोना संक्रमणाच्या रुग्णांची संख्या ८०७५४ वर गेली असून ३१३६ लोकांच्या मृत्यू झाला आहे. १७७२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि ५९८९७ रुग्ण बरे झाले आहेत असे सांगितले जात आहे. शी जीनपिंग यांनी वुहान भेटीत तेथील वैद्यकीय कर्मचारी, सैन्य अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी यांचे आभार मानले आहेत.

चीन मध्ये करोना नंतर वुहानला भेट देणारे शी जीनपिंग दुसरे राजकीय नेते आहेत. यापूर्वी पंतप्रधान ली केकीयांग यांनी २६ जानेवारीला वुहानला भेट दिली होती. जगभरात करोना बळींची संख्या ४०११ वर गेली असून १,१०,००० लोकांना संक्रमण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३९४० नवीन केसेस आढळल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment