भारतवंशी मतदारांना लुभावाण्यासाठी ट्रम्प यांची जाहिरातबाजी


फोटो सौजन्य भास्कर
अमेरिकेत नोव्हेंबर मध्ये होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकात भारतीय वंशाच्या अमेरीकन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी पूर्ण ताकद झोकली असल्याचे दिसून येत आहे. विशेषत भारत भेटीवरून परतल्यावर ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या मतदारांसाठी तीन डिजिटल जाहिरातींची योजना आखली आहे. या जाहिराती बुधवारी फेसबुक, युट्यूब सह अन्य सोशल मिडिया मध्ये लाँच होत आहेत.

विशेष म्हणजे रिपब्लिकन राष्ट्रपतीने निवडणूक प्रचारात भारतवंशी समुदायासाठी जाहिरातीचे कॅम्पेन चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे १४ लाख मतदार आहेत. २०१६ च्या निवडणुकीत भारतवंशीय मतदारांपैकी ८४ टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले होते. ट्रम्प यांनी भारतवंशीय मतदारांना लुभावण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु ठेवले असून त्याच्या प्रशासनात २२ सदस्य भारतीय वंशाचे आहेत.

भारतवंशीय मतदार स्वतःला डेमोक्रॅटिक म्हणवितात. ट्रम्प यांच्या प्रशासनात सध्या ५ भारतवंशीय खासदार असून ते सर्व डेमोक्रॅटिक आहेत.

Leave a Comment