ब्रिटन आरोग्यमंत्री नदीन डोरिस करोनाच्या विळख्यात


फोटो सौजन्य बीबीसी
ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नदीन डोरिस याना करोनाची लागण झाली असल्याचे त्यांच्या नमुना तपासणीत स्पष्ट झाले आहे. नदीन यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार त्यांची करोना चाचणी पोझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी घरातच स्वतःला वेगळे केले असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ब्रिटनचा आरोग्य विभाग करत असून नदीन यांना गेल्या काही दिवसात शेकडो लोक भेटले होते, त्यात पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचाही समावेश आहे.

नदीन म्हणतात, त्यांचा विभाग आणि कार्यालय काही दिवस बंद ठेवले जाणार आहे. आरोग्य विभागाने वेळेवर माहिती दिल्याने त्यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत. ब्रिटन मध्ये करोनामुळे आत्तापर्यंत सहा मृत्यू झाले आहेत तर २६ हजार जणांच्या तपासण्या झाल्या असून त्यात ३७३ लोकांच्या टेस्ट पोझिटिव्ह आल्या आहेत.

विशेष म्हणजे आरोग्य मंत्री नदीन यांनी करोनोविरुद्धच्या लढाईत कायदेशीर व्यवस्था तयार करण्यात महत्वाची कामगिरी बजावली असून असे करणाऱ्या त्या पहिल्या राजकीय नेत्या आहेत. नदीन शुक्रवारी आजारी झाल्या त्याच दिवशी त्यांनी या संदर्भातल्या नव्या कायदा मसुद्यावर सही केली होती. नव्या कायदा मसुद्यानुसार कंपन्या करोनासाठी विमा सुरक्षा देऊ शकणार आहेत. या मसुद्याच्या निमित्ताने नदीन शेकडो लोकांच्या संपर्कात आल्या होत्या असे समजते.

Leave a Comment