बिग बी ची नवी खरेदी- व्हिंटेज कार


फोटो सौजन्य पत्रिका
बॉलीवूड स्टार्स आणि लग्झरी कार्स यांचे नाते फार जुने आहे. बॉलीवूड स्टार्सनी खरेदी केलेल्या अलिशान कार्सची चर्चा नेहमीच होत असते. पण बॉलीवूड शेहेनशहा बिग बी ने एखादी नवी कार घेतली तर ती थोडी जास्त कौतुकाची बातमी होते याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या आनंदालाही या कार खरेदीमुळे पारावर राहिलेला नाही असे दिसून येत असून बिग बी ने त्याच्या नव्या कारसह एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

या वेळची बीग बीची कार खरेदी थोडी हटके आहे. कारण त्याने एक विंटेज कार खरेदी केली आहे. १९३८ च्या दरम्यान लाँच झालेली फोर्डची प्रिफेक्ट कार बिग बीने घेतली असून या कारचे उत्पादन १९६१ मध्ये बंद केले गेले होते. ही कार जेव्हा लाँच झाली तेव्हा तिची किंमत २२०० ते ३५२० पौड म्हणजे भारतीय रुपयात २ लाख रुपये होती. विशेष म्हणजे चार दरवाजाची ही कार त्यावेळी सर्वात स्वस्त कार मानली जात असे.

बिग बी ने या कारसाठी नक्की किती रक्कम मोजली हे समजू शकलेले नाही. मात्र काही जाणकारांच्या मते या कारसाठी ५० ते ८० लाख रुपये मोजले गेले असावेत. रविवारी ही कार मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट केली गेली. या कारसाठी १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन, ३ स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स आहे. तिचा सर्वाधिक वेग ताशी ९८ किमी असून ० ते ८० किमीचा वेग ती २२.८ सेकंदात घेते.

Leave a Comment