या जगप्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या मुलांना दिली हे मोलाची शिकवण


मुळे जन्माला घालणे सोपे असले तरी त्यांचे खऱ्या अर्थाने पालक बनणे ही मोठी जबाबदारी आहे. जगामधील काही प्रसिद्ध व्यक्तींनी ही जबाबदारी अतिशय उत्तम रित्या पार पाडली आहे. या स्टार्सनी आपल्या मुलांना आयुष्याबद्दल अतिशय मोलाची शिकवण दिली आहे.

‘खिलाडी’ कुमार अक्षय याने आपल्या मुलांना एक अतिशय मूलभूत शिकवण दिली आहे. अक्षयच्या मुलांनी जन्मल्यापासून अक्षयचे वैभव पहिले आहे, त्याचे व्यावसायिक यश, लोकप्रियता अनुभवली आहे. पण हे यश, वैभव, प्रसिद्धी सहजा-सहजी मिळालेली नाही याची जाणीव आपल्या मुलांना अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल करून देतात. यशस्वी होण्याकरिता मेहनतीची गरज आहे, आणि एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर जबर इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर ती गोष्ट मिळविण्याची हिम्मत मुलांमध्ये निर्माण व्हावी अशी अक्षयची इच्छा आहे. त्याच्या मुलांनी जबाबदार व्यक्ती आणि आदर्श नागरिक बनावे अशी अक्षयची इच्छा असून, त्या दृष्टीने तो आणि त्याची पत्नी सतत प्रयत्नशील असतात.

जगप्रसिद्ध फुटबॉल स्टार डेव्हिड बेकहॅम अवाढव्य संपत्तीचा मालक देखील आहे. पण तरीही आयत्या मिळालेल्या वैभवाची चटक त्याच्या मुलांना लागू नये यासाठी डेव्हिड आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया प्रयत्नशील असतात. स्वतःच्या हिंमतीवर मुलांना पैसा कमावता आला पाहिजे, तरच त्यांना पैशाचे मोल समजते, या वर डेव्हिडचा पूर्ण विश्वास आहे. डेव्हिडचा मुलगा ब्रूकलीन वयाच्या पंधराव्या वर्षीपासूनच आपले शिक्षण सांभाळून, एका कॉफी शॉप मध्ये काम करून आपली पॉकेटमनी स्वतःच कमावतो आहे.

अमेरिकेचे पूर्वराष्ट्रपती बराक ओबामा यांच्या मुली मलिया आणि साशा अतिशय विनम्र आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जातात. याचे श्रेय बराक आणि त्यांची पत्नी मिशेल यांना जाते. आपल्या मुली सर्वगुणसंपन्न असाव्यात आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असावी या करिता बराक आणि मिशेल सदैव प्रयत्नशील असतात. आपले वडील बडे प्रस्थ असल्याचा गर्व या मुलींनी कधीही मनाशी बाळगला नाही. किती ही श्रीमंती, मानसम्मान, अधिकार मिळाले, तरी त्याने भुलून न जाता जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहणे महत्वाचे आहे, ही शिकवण बराक आणि मिशेल या जोडीने आपल्या मुलींना दिली.

Leave a Comment